आम्ही विविध उद्योगांमध्ये नाविन्य आणि वाढीला चालना देणारे काही यशस्वी प्रोजेक्ट्स.
लहान आणि मध्यम उद्योगांना डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन आणि बाजारातील स्पर्धेत वाढ करण्यासाठी सहाय्य करणारे उपाय.
शिवसाम्राज्य उद्योग समुह संपुर्ण महाराष्ट्रभर एकी, लेकी आणि प्रगती यांसाठी शिवशभूंची आचार विचार आणि निती या ब्रीदवाक्यासह सामाजिक व व्यवसायिक दृष्ट्या कार्यरत आहे.
शिवसाम्राज्य उद्योग समूह सामान्य माणसातील असामान्य कर्तुत्वाला वाव देण्याकरिता निर्माण झालेलं व्यवसायिक संघटन आहे. जे अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागविण्याकरिता बचतीच्या विविध मार्गाची उपलब्धता करून देते. आतापर्यंत लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून शिवसाम्राज्य उत्कृष्ट सुविधा पुरविण्याकरिता सदैव तत्पर आहे.
समाजामध्ये महिला सक्षमीकरण करणे, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी, विविध नोकरी व व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी शिवसाम्राज्य उद्योग समुहामार्फत विविध प्रकल्प राबवण्यात येतात. शिवसाम्राज्य उद्योग समुह महिलांना प्राधान्यस्थानी ठेवून थोडक्या वेळामध्ये करता येणारा - शिवसाम्राज्य उद्योगामिनी हा प्रकल्प चालवत. ज्याअंतर्गत महिलांना नवीन व्यवसाय निर्माण होत आहे. या प्रकल्प चालवण्यासाठी शिवसाम्राज्य कडून प्रशिक्षण देण्यात येत. त्यानंतर महिला हा उद्योग चालवू शकतात.
महिलांना कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. महिला घरबसल्या हा व्यवसाय करू शकते, कोणताही कच्चा माल घेऊन पदार्थ बनवायचा नाही. बनवलेला पदार्थ दारोदारी विकण्याची गरज नाही. महिलांनी दिलेला वेळ हे या व्यवसायाचे भांडवल आहे. महिलेला मिळालेल्या लॉग ईडी नुसार कामाची नोंद शिवसाम्राज्य उद्योग समुहाकडे पोहचते व त्यानुसार महिलेला कामाचा योग्य मोबदला दिला जातो.
दैनंदिन बचती बरोबरच कमी वेळे मध्ये जास्तिचा मोबदला मिळवण्यासाठी शिवसाम्राज्य उद्योगामिनी हा उत्तम पर्याय आहे. या प्रकल्पा अंतर्गत महिलांमध्ये सक्षमीकरण होऊन महिला उद्योजकता निर्माण करणे, व्यवसाय-उद्योगाबरोबरच विविध बचतीच्या मार्गाची, आरोग्य विषयक विविध विमा, योजना याची माहिती होण्यासाठी मार्गदर्शक चर्चासत्र घेण्यात येतात. ज्याद्वारे सर्व महिलांमध्ये उद्योजिक साक्षरता वाढून प्रत्येक स्त्रिला हक्काचा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल. या हेतुने उद्योगामिनी हा उपक्रम चालवण्यात आला आहे.